Maharashtra Rain Alert update 2024 : महाराष्ट्रात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने आज मुंबई आणि पुण्यात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. पालघर आणि मुंबईसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हवामान विभागाने कोकणासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड आणि पालघर या दोन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, नंदुरबार, नाशिक, धुळे, पुणे, ठाणे या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांतही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, गोंदिया, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रासाठीही पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.