लाडक्या बहिणींना मोठा दिलासा बँक खात्यात संदर्भात मोठा निर्णय ! शासन परिपत्रक जारी

Ladki Bahin Yojana Bank Account:राज्य सरकारकडून राज्यातील महिलांना आर्थिक लाभ मिळावा म्हणून चालू केलेली लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांकडून अर्ज मागविण्यात आले होते व लाभार्थी महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांची मिळून तीन हजार रुपये देखील खात्यावरती ट्रान्सफर केले आहेत.

पण मात्र ज्या महिलांचे बँक खाते ज्या त्या बँकेमध्ये आहे त्या बँकेने या लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा झाल्यानंतर त्याच्यामधून वेगवेगळे हप्ते व इतर चार्जेस कपात करण्यास सुरुवात केली आहे त्याच अनुषंगाने राज्य सरकार द्वारे राज्यातील सर्व बँकांना हे पैसे कपात न करण्याबाबत शासन परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे.

समन्वयक राज्य स्तरीय बैंकर्स समिती, बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल शिवाजीनगर, पुणे-५

२) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (सर्व) (मुंबई वगळून)

विषयः- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीबाबत..

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै, २०२४ व माहे ऑगस्ट, २०२४ या दोन्ही महिनांच्या एकत्रित रु.३०००/- इतका आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना त्यांचा आधार संलग्न (Aadhar Seeded) बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने (DBT) अदा करण्यात आला आहे.

तथापि, सदर योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ आहरित करता येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

तरी “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत आर्थिक लाभ अंतिम पात्र लाभार्थी महिलांना प्राप्त होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:

१) “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम)कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये, ही रक्कम विशिष्ट

उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. २) सदर रक्कम त्याच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये.

३) काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तात्काळ सुरु करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात यावी.

उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने आपण आपल्यास्तरावरुन संबंधितांना आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात ही, विनंती.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment