लाडकी बहीण योजनेचा 3 रा हप्ता 29 सप्टेंबरला खात्यावर जमा होणार ! या महिलांना लाभ मिळणार नाही, नवीन यादी जाहीर

Ladki Bahin Yojana September Beneficiary List: राज्यातील लाडक्या बहिणी लाभार्थी महिलांना तिसऱ्या हप्त्याचे वितरण सोलापूर जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडवणीस अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी राज्यातील 40 लाख लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्तांतरीत करण्यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा कार्यक्रमाचे नियोजन केले गेले मात्र काही कारणामुळे हा कार्यक्रम पार पडला नाही यामुळे  बहीण योजनेची मागणी आहे की योजनेचा हप्ता वितरित करण्याचा एक तारीख निश्चित करण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत योजनेसाठी अर्ज केलेला नाही, अशा पात्र महिलांनी मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे आवश्यक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 15 लाख महिलांनी अर्ज केले आहेत. यापैकी एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्यांना आधार लिंक नाही. आधार लिंक केल्याशिवाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. पुढील लाभाची रक्कम २९ सप्टेंबर रोजी वितरित केली जाईल.

सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ३६ हजार महिलांच्या बँक खात्यांना आधार लिंक नाही. जर त्यांनी त्यांचे बँक खाते आधारशी लिंक केले नाही तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेचा लाभ मिळणार नाही. 29 सप्टेंबरपूर्वी अर्जदार महिलांना संबंधित बँकेत जाऊन त्यांचे खाते आधारशी लिंक करून घ्यावे लागेल. त्यांची यादी राज्यस्तरावरून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे. ज्यांनी सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज केला पण अद्याप लाभ मिळालेला नाही अशा महिला आहेत.

लाभार्थी महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment