जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पाहायचा ?
वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला वर डाव्या बाजूस तीन आडव्या रेषा दिसत असतील. त्यावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक रकाना येईल.
आता तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्याखाली तुमच्या जमिनीचा जो गट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे.
आता तुमच्या समोर तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.
तर अशा पद्धतीने आपण जमिनीचा नकाशा मोबाईलवर ऑनलाइन पाहू शकतो.